Top Ad unit 728 × 90

The Marshmallow Test

एक उशीराचं समाधान: ( By -Prof.Walter Michel Stanford University ) * एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक एक छानसं चाँकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली *   मुलानो! मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो, तो पर्यंत तुम्ही तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत. असे सांगून ते शिक्षक वर्ग कक्षातून बाहेर पडले. वर्गात काही क्षण शांतता होती, प्रत्येक मुल त्यांच्या हातातल्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत: ला चाँकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. दहा मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला. आढावा घेतला. संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि तिच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत होती. शिक्षकाने गुपचुपपणे या सात मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदविली आणि नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखविली. या शिक्षकाचे नाव होते * प्रोफेसर वॉल्टर मिशेल *. बऱ्याच वर्षानंतर, प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि सात मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहीती मिळाली की या सात मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत. मग प्रोफेसर वाल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा ज्यांनी चाॅकलेटस् खाल्ली होती त्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते, त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागला होता, काही व्यसनाधीन झाले होते. * या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला ते वाक्य होते - * "जो माणूस दहा मिनिटे धैर्य ठेवू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही." या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला * "मार्श मेलो थिअरी" * असे नाव देण्यात आले कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेल्या चाॅकलेटचे नाव "मार्श मेलो" होते . ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते.   या सिद्धांतानुसार, जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये * 'धैर्य' * हा गुण विषेशत्वाने आढळतो, कारण ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते, ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही आणि हा गुणविशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्ववाचा धनी असतो. * धैर्य हे जीवनाचे सार आहे * 📙📘📗📕📚📘📗
The Marshmallow Test Reviewed by my area shops on February 27, 2020 Rating: 5

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.